Wednesday, August 19, 2015

धुंदी ....

हलकेच रंग बदलणारी संध्याकाळ
पेल्यांच्या मधुर किणकिणीत हरवली होती
संगीताच्या तालावर पेले उचलले जात होते
भानाच अस्तित्व हरवण्यासाठी होत
थकलेले सारे श्वास आठवणीत जमा होत होते
हलकेच सारे श्वास या विश्वा पासून तुटत होते
व प्रत्येकास एका तरंगत्या विश्वात नेत होते
जेथे सार्‍या गोष्टी तरंगत होत्या
आपल्या अवजड पणाला विसरुन ........


-    जतिन संखे   

No comments:

Post a Comment