Tuesday, June 24, 2014

रेड लाइट

·        

उर्वरीत लपलेल जग
झोपेत असल्याच सांगतोय
व उचललेल्या पावलांच्या
दिशेत वाहून जाणच
पसंतीस उतरतय
त्यांच्या उथळ मनांचा
व खोल शरीरांचा नाच
काहीसा त्यांनाही दुखवतोय
व इतरांना सुखवतोय
अंधारातल जग वेगळं
ठरवुन तेच चेहरे
पुन्हा उगवतात वेगळे बनुन
हयातच काही नकोस शिजतय
नरकातील स्वयंपाक घराप्रमाणे ....

-----------------जतिन संखे . 

विसरायलाच हवं .....

विसरायलाच हवं 
आता सारं काही
बरचं जुन झालय
तुला आठवत
स्वतः ल त्रास देणे
पण तुला विसरण्याच्या
बहाण्याने
तुला आठवणे
हेही जुनाच झालय ना .........


.............................. जतिन संखे  


निरंतर.....

निरंतर


रोज येते पहाट 
नवा दिवस घेऊन
मी जुनाच असतो
नवीन दिवसा सोबत
कमी जास्त प्रमाणात
खर्‍या खोट्या प्रमाणात
समजणार्‍या नसमजणार्‍या
जगासोबत जुळवत
माणसांनी मांडलेल्या
माणसांच्या देखाव्यात  
एक एक दिवस
पालथा घालतो
स्वतहाच्याच गोंधळात
भर घालत
की हेच जीवन आहे
स्वतः ला समजवत
मग पुन्हा मी झोपतो
नवीन दिवसाची वाट पाहत  
असलेल अस्तित्व स्वीकारत
वा हरवलेल अस्तित्व शोधत
                                     ---------------- जतिन संखे .


श्वास .....



श्वास
मान्य केलं की
मनावर घेतलं तर
बर्‍याच गोष्टी
सहज थांबवु शकतो
जसं डोळे बंद करून
समोरचं दिसणं
पण तुझ्या आठवणी
त्या तर श्वासांसोबत
चालतात
तूच संग आता
काय बंद करू ?

                                                                                                                                                     

n  जतिन संखे