Wednesday, August 19, 2015

हरवलेल्या कविता

बर्‍याच वेळेस अस होत
कधी गर्दीतल्या एकांतात
तर कधी एकांतातील गर्दीत
काही कल्पना जमा होतात
काही शब्द जमत जातात
पेन कागद काही नसत
व विचारांनी भरलेलं मन असत
मग सवडीने घरी येतो
कागद पेन जवळ घेतो  
तेव्हा लिहायचं विचार करतो
सार्‍या कल्पना हरवलेल्या असतात 
सारे शब्द विखुरलेले असतात
व आठवत असते ती फक्त
मनाने अनुभवलेली बेधुंद अवस्था.



  जतिन संखे  

No comments:

Post a Comment