Sunday, April 23, 2017

शुन्य

अफाट खोली असलेला तो शून्य 
घेरतो मला काळोखात 
उजेडाचे सारे रस्ते बंद करून 
मी तिथेच पहुडलेला असतो 
शून्याच्या उथळ भागात 
जिथे दुसरे कुठलेच आवाज
ऐकू येत नाहीत 
पण त्रस्त करत असतो 
कानठळ्या बसविणारा 
मेंदूच्या गर्भातून येणारा आवाज 
शरीर करत असते जगण्याची 
क्षीण थंड हालचाल 
मी खोली कडे पाहत असतो 
शून्याच्या 
कदाचित नवीन सुरवात असावी 
खोल दुरवर कोठेतरी 
 जिथे मिळेल
थोडा ऑक्सिजन निपचित 
पडलेल्या मनाला 
माहित आहे 
दर्प निघणार नाही 
तुझ्या आठवणींचा
तरीही मन सांगत असते 
कदाचित असतील काही 
प्रकाशाचे कण
शेवटच्या टोकाला ..

........ जतिन 

Tuesday, April 4, 2017

तुझ्याशिवाय...

मन भरुन येते 
श्वास भरूनी येतात
हृदय भरुन येत 
डोळे भरूनी येतात 
अश्रु भरूनी येतात 
विचार भरूनी येतात
उर भरुन येत..... 
.
.
.
.
आणी मी मात्र 
रिकामा होत जातो
तुझ्याशिवाय ....



- जतिन