Wednesday, December 6, 2017

निरंतर

निरंतर

रोज येते पहाट 
नवा दिवस घेऊन
मी जुनाच असतो
नवीन दिवसा सोबत
कमी जास्त प्रमाणात
खर्‍या  खोट्या प्रमाणात
समजणार्‍या   नसमजणार्‍या 
जगासोबत जुळवत
माणसांनी मांडलेल्या
माणसांच्या देखाव्यात 
एक एक दिवस
पालथा घालतो
स्वतहाच्याच गोंधळात
भर घालत
की हेच जीवन आहे
स्वतः ला समजवत
मग पुन्हा मी झोपतो
नवीन दिवसाची वाट पाहत 
असलेल अस्तित्व स्वीकारत
वा हरवलेल अस्तित्व शोधत

  ---------------- जतिन संखे .

No comments:

Post a Comment