Wednesday, December 6, 2017

गर्भ

गुणसूत्रे प्रवास करत असतात अविरत
प्रेमाच्या मार्गाने जाताना
रस्त्यात येतात विविध मानव निर्मित
वंश धर्म जातीच्या व्याख्या
असतात मोठाल्या भिंती 
संकुचित पणाच्या सर्वत्र
तरी कधी असतात साखळ्या
मर्यादित विचार क्षमतेच्या
पण गुणसूत्रे प्रवेश करतात
प्रेमाच्या मार्गाने निसर्गाची आस धरत
वेली बनुन शिरतात
आत हजारो कुंपणाच्या
पसरवतात सुगंध वेली वरचे फुले
निसर्ग शह देतो
मानव निर्मित तोकड्या व्याख्यांना
कितीही छाटले तरी
पुन्हा पुन्हा उगवतात ती फुले
संक्रमण करतात गुणसूत्रे
सृजनाचा नवीन अविष्कार बनुन
व जन्मतात नव नवीन गर्भ
सृष्टीला नवीन अर्थ देऊन.

गर्भ - जतिन

No comments:

Post a Comment