मध्यावर येऊन सूर्य
अस्तित्व पाजू लागतो
इतकं की प्रत्येक क्षणात
तोच आठवू लागतो
उन्हात तापलेले रस्ते
आग ओकु लागतात
भाजुन निघालेल्या डांबराला
नरम करू पाहतात
भरलेला बाजार ही
ओसाड वाटु लागतो
तापलेला प्रत्येक क्षण
सेकंदात मोजू लागतो
घामाने भिजलेला शर्ट
शरीराच्या मिठीत सामावतो
हवेच भांडवल घेऊन
थंड होऊ पाहतो
अस्तित्व नसलेली सावली
भाव खाऊन जाते
घामाळलेल्या देहाला
थंड झुळूक देते
वारा , पाऊस , सकाळ , संध्याकाळ
सार काही सुंदर होऊन जातं
जेव्हा दुपारचं ऊन
एकदा डोक्यावरून जात .
दुपारचं ऊन
- जतिन संखे #jatinsankhepoetry
No comments:
Post a Comment