लाटांना मुळीअस्तित्वच नसत
प्रवाहाच्या दिशेने पळत असतात त्या
क्षणात ऊँच उसळतात
व क्षणात नाहिश्या होतात
एक संपली की दूसरी तयारच असते
मग आपण उगीचच गंतुन राहतो
.
.
.
भावनांचही तसच असत.
- जतिन
लाटांना मुळीअस्तित्वच नसत
प्रवाहाच्या दिशेने पळत असतात त्या
क्षणात ऊँच उसळतात
व क्षणात नाहिश्या होतात
एक संपली की दूसरी तयारच असते
मग आपण उगीचच गंतुन राहतो
.
.
.
भावनांचही तसच असत.
- जतिन
लाटांना ऊंची असते तर
समुद्राला खोली असते
लाटांना आवाज़ असतो
तर समुद्र शांत असतो
लाटा कितिही उनचाऊँ
सांगत असल्या तरही
अथांगता समुद्राच्या
शांतातेत दडलेली असते
समुद्राच्या गुढते मध्ये
लपलेल्या भावनांचा
किनार्यावर बरसलेल्या लाटा
हया उद्रेक असतात
म्हणुन लाटाही समुद्राचाच
भाग असतात .
.......... ज़तिन
मन धावत असते
रात्र संपत जाते
इवल्या इवल्या
पापण्यां च्या आड़
विश्व निद्रेत जाते
अंधारलेल्या देखाव्यात
मन अफ़ाट बनते
आकार हरवून
विचार सारे
धावत सुटतात
दिशा विसरून
शरीर तिथेच असते
हरवलेल्या विश्वात
धड़ प्रश्न ही नसतात
ना उत्तर असतात
एक पोक़ळी असते
विचारांच्या वादळात
आकार दिशा अस्तित्व
सारे मागे पड़ते
शरीर पृथ्वी बनते
मनाच्या अंतराळात....
- जतिन
प्रवास
सारे भावनांचे आवेग
हे शरीर हे मन
विसावतात तुझ्या मीठीमध्ये
गर्दी , गोंगाट , धावपळ
क्षणात ठंड होतात
तुझ्या ओठांच्या स्पर्शाने
कित्येक वादळ मनातली
हलकेच शमतात
तुझ्या डोळ्यांच्या ओलाव्यात
माझ्यातिल अस्थिरतेला
आधार मिळतो
तुझ्या नाजुक स्पर्शाने
.
.
.
.
संध्याकाळी दिवस जेव्हा थांबतो
तेव्हा मला जाणवत
तुझ्याकड़ुन तुझ्याकडेच असतो
मला हवाहवासा रोजचा प्रवास .
- जतिन संखे
मध्यावर येऊन सूर्य
अस्तित्व पाजू लागतो
इतकं की प्रत्येक क्षणात
तोच आठवू लागतो
उन्हात तापलेले रस्ते
आग ओकु लागतात
भाजुन निघालेल्या डांबराला
नरम करू पाहतात
भरलेला बाजार ही
ओसाड वाटु लागतो
तापलेला प्रत्येक क्षण
सेकंदात मोजू लागतो
घामाने भिजलेला शर्ट
शरीराच्या मिठीत सामावतो
हवेच भांडवल घेऊन
थंड होऊ पाहतो
अस्तित्व नसलेली सावली
भाव खाऊन जाते
घामाळलेल्या देहाला
थंड झुळूक देते
वारा , पाऊस , सकाळ , संध्याकाळ
सार काही सुंदर होऊन जातं
जेव्हा दुपारचं ऊन
एकदा डोक्यावरून जात .
दुपारचं ऊन
- जतिन संखे #jatinsankhepoetry
तुझ्या आठवणी
वाळत टाकल्यात
म्हटलं थोडी ओल
कमी झाली की
गाठोडं बांधुन टाकता
येईल मनाच्या कोपऱ्यात
पण साला पाऊस
नेमका येतो पूर्वीसारखाच
व पुन्हा ओल करतो
जुन्या जखमांना
मग ओल्या आठवणी घेऊन
मी भिजत बसतो
.....तुझ्या पावसात
- जतिन
तु येतेस तेव्हा
आभाळात ढग जमतात
पाऊस पडत नाही
वारा साठुन राहतो
पण वादळ येत नाही
सगळं स्थिर होऊन
जमा होत एका क्षणात
.
.
मग तुझी नजर
नजरेला येऊन भिडते
.
.
वारा वाहु लागतो
विजा कडाडू लागतात
जोराचे वादळ येते
मुसळदार पाऊस
आदळू लागतो
व मी वाहुन जातो
तुझ्या वादळात....
- जतिन
निरंतर
रोज येते पहाट
नवा दिवस घेऊन
मी जुनाच असतो
नवीन दिवसा सोबत
कमी जास्त प्रमाणात
खर्या खोट्या प्रमाणात
समजणार्या नसमजणार्या
जगासोबत जुळवत
माणसांनी मांडलेल्या
माणसांच्या देखाव्यात
एक एक दिवस
पालथा घालतो
स्वतहाच्याच गोंधळात
भर घालत
की हेच जीवन आहे
स्वतः ला समजवत
मग पुन्हा मी झोपतो
नवीन दिवसाची वाट पाहत
असलेल अस्तित्व स्वीकारत
वा हरवलेल अस्तित्व शोधत
---------------- जतिन संखे .
गुणसूत्रे प्रवास करत असतात अविरत
प्रेमाच्या मार्गाने जाताना
रस्त्यात येतात विविध मानव निर्मित
वंश धर्म जातीच्या व्याख्या
असतात मोठाल्या भिंती
संकुचित पणाच्या सर्वत्र
तरी कधी असतात साखळ्या
मर्यादित विचार क्षमतेच्या
पण गुणसूत्रे प्रवेश करतात
प्रेमाच्या मार्गाने निसर्गाची आस धरत
वेली बनुन शिरतात
आत हजारो कुंपणाच्या
पसरवतात सुगंध वेली वरचे फुले
निसर्ग शह देतो
मानव निर्मित तोकड्या व्याख्यांना
कितीही छाटले तरी
पुन्हा पुन्हा उगवतात ती फुले
संक्रमण करतात गुणसूत्रे
सृजनाचा नवीन अविष्कार बनुन
व जन्मतात नव नवीन गर्भ
सृष्टीला नवीन अर्थ देऊन.
गर्भ - जतिन
हेडलाइटच्या प्रकाशात रात्र
जीवंत होउ लागते
चाकांच्या वेगासोबत
गाड़ी मोकाट होउ पाहते
प्रकाशाची चादर टाकुन
काळ्या रस्त्यावर
पांघरूण घालते
प्रकाशाला कापत जाउन
स्वतःची लय शोधते
भरघाव गाडया व रस्ता
हयांच वेगळ संगीत बनत
मग रस्त्यावर च्या लेन
गिटारीच्या स्ट्रिंगस बनतात
हेडलाइटच्या रंगबेरंगी
झगमगाटात
महफ़िल सजु लागते
गाडीतिल संगीत हलकेच
हृदयाचा ठाव घेते
रस्ताच चारही दिशा
रस्ताच पंचतत्व
तर कधी रस्ताच
अस्तित्व होऊनी जातो
चाक फिरत राहतात
संवाद वार्याशी होतों
मेंदु अंतराळात पोहचतो
व प्रवास आत्मा बनतो.
नाइट ड्राइव्ह
- जतिन