वारा ज़ोरात वाहु लागला
वाजु लागले खिडक्या दरवाज़े
चालेना काही वादळा पुढे
झाले सूचेनासे त्याला काही
पाहता गोंधळ तो शांत जाहला
सर्व खिडक़या उघड़या पडल्या
दरवाज़े ही आपटु लागले
भीती, अस्थिरता नकोशी झाली
तन मन सारे सैरभर झाले
क्षणभर मग तो स्थब्ध होउनी
वादळात त्या ध्यानस्त झाला
डोळे ग़च्च मीटुनी घेतले
मन सावकाश स्थिर झाले
ज्ञान मनी तरंगुनी आले
बाहेरिल वादळ मनात शमले
नेत्र उघडले सर्व दिसले
वादळ मात्र तसेच होते
तो तिथेच स्थिर होता
स्थब्ध निश्चल शांतपणे
शरीरा पासुन गर्भा पर्यन्त
सारे विश्व त्यास स्वतःत दिसले
उघड़या दाराने बाहेर पडला
काट्यांतुनी पावुले टाकित
घट्ट अंधार सर्वत्र होता
समोर काही दिसतच नव्हते
.
.
.
अंधारलेल्या जगता पुढे
तो मात्र प्रकाशमान होता .
बुद्ध
- जतिन
No comments:
Post a Comment