घेरतो मला काळोखात
उजेडाचे सारे रस्ते बंद करून
मी तिथेच पहुडलेला असतो
शून्याच्या उथळ भागात
जिथे दुसरे कुठलेच आवाज
ऐकू येत नाहीत
पण त्रस्त करत असतो
कानठळ्या बसविणारा
मेंदूच्या गर्भातून येणारा आवाज
शरीर करत असते जगण्याची
क्षीण थंड हालचाल
मी खोली कडे पाहत असतो
शून्याच्या
कदाचित नवीन सुरवात असावी
खोल दुरवर कोठेतरी
जिथे मिळेल
थोडा ऑक्सिजन निपचित
पडलेल्या मनाला
माहित आहे
दर्प निघणार नाही
तुझ्या आठवणींचा
तरीही मन सांगत असते
कदाचित असतील काही
प्रकाशाचे कण
शेवटच्या टोकाला ..
........ जतिन
No comments:
Post a Comment