तु सावली असतेस
कधी कधी
रणरणत्या उन्हातली
अस्तित्व सुसहय करनारी ....
तर कधी असतेस
ठंड़गार वार्याचि झुळुक
सर्वांग शहारुन टाकणारी ...
तु कधी असतेस
चिम्ब करणारा पाउस
मनाचा प्रत्येक कोपरा
भिजवुन टाकणारा....
असतेस तु कधी
मोगरयाचा सुगंध
माझ अस्तित्व
सुगंधित करणारा...
कधी कधी असतेस तु
हिरवळीचा स्पर्श
हवाहवासा व
सर्वांग मोहरून टाकणारा ...
.
.
.
तु आहेस
अवघा निसर्ग
जीवन सुसहय करणारा ...
तु
- -- जतिन संखे 9555943682
No comments:
Post a Comment