Friday, October 9, 2015

ध्यान

 

पावले पुढे पडत होती 
गाड्यांचा आवाज 
फेरीवाल्यांचा गोंगाट 
आणि सुन्न झालेल मन
हळूच वारयाची झुळुक आली 
पडलेल्या पावलां सोबत 
गोंगाट अस्पष्ट झाला
हळु हळु नजर स्थिरावली
अफाट अस्तित्वा सोबत 
फ़ेसाळनारया लाटांचा आवाज 
पूर्ण अंगात भिनला 
हलकेच नकळत 
शरीर तरंगु लागले
घोंगवणारया वारया सोबत 
ओल्या वाळुचा स्पर्श 
ह्रुदयातुन मेंदु पर्यन्त गेला 
सार शरीर अदृश्य झाल 
अवजड पणाला विसरून 
सार जग शून्य झाल
मी जवळ आलो स्वतः च्या 
व अलिंगन दिल 
स्वतः ला.........

...................... जतिन संखे

No comments:

Post a Comment