Saturday, November 15, 2014

समतोल




एक एक करुन श्वास
टुटतात शरीरापासुन
मग प्रत्येक
श्वासागणिक मृत्युकडे
जाणारा हां प्रवास
समजुनहि आनंदाने
सकरात्मकतेने जीवन
म्हणून जगतोय आपण


पण त्याच वेळी
जीवनरूपी तात्पुरत्या
असलेल्या प्रवासाला
स्वार्थ द्वेष मत्सर जोडून
नकारात्मक साथ
देतोय आपणच

इथेच कुठेतरी
समतोल साधत
असाव जीवन ......



 ......................;.................जतिन संखे

Wednesday, September 24, 2014

तुषार

तुषार

पुर्णपणे स्वच्छंदी असावे
दगडावर आपटूनही
मुक्तपणे उधळणार्‍या
तुषारां प्रमाणे
बर्‍या वाईट भावनांचा
स्पर्शही नसावा
व स्वच्छ मोकळेपणा हीच
त्याची ओळख असावी
आदळण्याच दुख नसावे
व उडण्याचा आनंद नसावा
शरीर पारदर्शक असावं
व रक्ताचा स्पर्श नसावा


.............जतिन संखे . 

Tuesday, June 24, 2014

रेड लाइट

·        

उर्वरीत लपलेल जग
झोपेत असल्याच सांगतोय
व उचललेल्या पावलांच्या
दिशेत वाहून जाणच
पसंतीस उतरतय
त्यांच्या उथळ मनांचा
व खोल शरीरांचा नाच
काहीसा त्यांनाही दुखवतोय
व इतरांना सुखवतोय
अंधारातल जग वेगळं
ठरवुन तेच चेहरे
पुन्हा उगवतात वेगळे बनुन
हयातच काही नकोस शिजतय
नरकातील स्वयंपाक घराप्रमाणे ....

-----------------जतिन संखे . 

विसरायलाच हवं .....

विसरायलाच हवं 
आता सारं काही
बरचं जुन झालय
तुला आठवत
स्वतः ल त्रास देणे
पण तुला विसरण्याच्या
बहाण्याने
तुला आठवणे
हेही जुनाच झालय ना .........


.............................. जतिन संखे  


निरंतर.....

निरंतर


रोज येते पहाट 
नवा दिवस घेऊन
मी जुनाच असतो
नवीन दिवसा सोबत
कमी जास्त प्रमाणात
खर्‍या खोट्या प्रमाणात
समजणार्‍या नसमजणार्‍या
जगासोबत जुळवत
माणसांनी मांडलेल्या
माणसांच्या देखाव्यात  
एक एक दिवस
पालथा घालतो
स्वतहाच्याच गोंधळात
भर घालत
की हेच जीवन आहे
स्वतः ला समजवत
मग पुन्हा मी झोपतो
नवीन दिवसाची वाट पाहत  
असलेल अस्तित्व स्वीकारत
वा हरवलेल अस्तित्व शोधत
                                     ---------------- जतिन संखे .


श्वास .....



श्वास
मान्य केलं की
मनावर घेतलं तर
बर्‍याच गोष्टी
सहज थांबवु शकतो
जसं डोळे बंद करून
समोरचं दिसणं
पण तुझ्या आठवणी
त्या तर श्वासांसोबत
चालतात
तूच संग आता
काय बंद करू ?

                                                                                                                                                     

n  जतिन संखे