मिठीत माझ्या तुज़े श्वास तु
विसरुनी गेलीस
आणि श्वासात तुझ्या मी
अलगत अडकून पडतो ...
स्वप्नात माझ्या तुझी रात्र तु
हरवून गेलीस ...
आता गर्द अंधारात मी
स्तब्धपणे तुलांच शोधतो ......
गप्पांमधले काही शब्द तु
सोडून गेलीस ...
एकटाच कधी मी
त्या शब्दांशी गप्पा
मारत बसतो ....
देहात माझ्या तुझा अंश तु
सोडून गेलीस
अंशात तुझ्या मी माझा देह
हरवून बसतो ....
तु
........ ज़तिन संखे